Belagavi

१८ जुलैला लायन्स क्लबचा पदग्रहण सोहळा

Share

लायन्स क्लब ऑफ बेळगाव सीनियर क्लबच्या वतीने १८ जुलै रोजी जिल्हा ३१७-बी च्या कॅबिनेट पदग्रहण समारंभाचे आयोजन बेळगावात करण्यात आले आहे. जिल्हा गव्हर्नर लायन राजशेखर हिरेमठ यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

या सोहळ्याला दिल्लीचे आंतरराष्ट्रीय संचालक लायन विनय मित्तल मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात कर्नाटक व गोव्यातील ११० हून अधिक क्लबांचे प्रतिनिधी सहभागी होणार असून, यादरम्यान एका सुसज्ज मोबाईल रक्तपेढीचे लोकार्पणही केले जाणार आहे.

पत्रकार परिषदेला लायन श्रीनिवास शिवांगी, लायन मोनिका सावंत, लायन सतीश पाटील, लायन अशोक कटवे, लायन हेमंत कित्तूर, लायन दिनेश भिर्डे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लायन श्रीधर उप्पीन यांच्या नेतृत्वाखाली तयारी सुरू आहे.

Tags: