Uncategorized

माजी विद्यार्थ्यांकडून सरकारी शाळेला मदतीचा हात

Share

बेळगाव येथील गणपत गल्लीतील सरकारी मराठी शाळा क्रमांक २ च्या २००३-०४ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि छत्र्यांचे वाटप करून एक नवा आदर्श घालून दिला आहे. पावसाळ्याचे दिवस लक्षात घेऊन या विद्यार्थ्यांनी आपली सामाजिक जबाबदारी चोख पार पाडली आहे.

या उपक्रमांतर्गत शाळेतील मुलांना आवश्यक असणारी पुस्तके, कंपास बॉक्स, एक्झाम पॅड आणि छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षक वृंद तसेच माजी विद्यार्थी धनंजय मोरे, विजय मोहिते आणि अरविंद चिक्कोर्डे उपस्थित होते. या प्रशंसनीय कार्यासाठी पूजा जाधव आणि कुलदीप ताशिलदार यांनी विशेष सहकार्य केले असून, शाळेच्या मुख्याध्यापकांनी व शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यांच्या या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांचे आभार मानले आहेत.

 

Tags: