बेळगाव जवळील जे.आर.डी. हायस्कूलच्या २००४-०५ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या ‘गुरुवंदना’ कार्यक्रमात अत्यंत भावूक क्षण पाहायला मिळाले. या कार्यक्रमाला उपस्थित सेवानिवृत्त व ज्येष्ठ शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यांना देशाचे सुजाण नागरिक बनण्याचा महत्त्वपूर्ण संदेश दिला.

या सोहळ्यात माजी विद्यार्थी चेतन देसाई, आनंद हिरेमठ, चंदन बडवण्णावर, माणिक सायबण्णावर, गंदिगवाड, बाहुबली नवलूर यांच्यासह अनेकांनी उपस्थित राहून आपल्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी व्यासपीठावर उपस्थित ज्येष्ठ शिक्षक बी.एच. बिळगोजी, ए.सी. जक्कण्णावर, सुनील जराळे, एम.बी. पाटील, ए.वाय. गुमाज, बी.एम. लक्कनगौडर, नलिनी अगरे, देवकी काकती आणि ए.ए. सनदी यांनी मार्गदर्शन केले.


पालकांनी मुलांसाठी केवळ भौतिक संपत्ती निर्माण न करता, त्यांना उत्तम शिक्षण आणि संस्कार देऊन देशाची खरी संपत्ती बनवावे, अशी भावनिक साद शिक्षकांनी यावेळी घातली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेच्या माजी विद्यार्थी संघाने आणि कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.



Recent Comments