राज्यात दुष्काळ असतानाही विकासकामे सातत्याने सुरू असून सरकारी तिजोरी रिकामी झाल्याचा विरोधकांचा आरोप चुकीचा आहे, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जารकीहोळी यांनी केले आहे. हावेरी येथे विविध विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते.

दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकारकडे पैसे नाहीत या आर. अशोक यांच्या विधानाचा समाचार घेताना, पैसे नसतील तर एवढी विकासकामे कशी सुरू आहेत, असा सवाल सतीश जारकीहोळी यांनी केला. तसेच अधिकाऱ्यांनी पाण्याच्या उपलब्धतेनुसार बॅरेजेसच्या दुरुस्तीची पूर्वतयारी ठेवावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

आरएसएस बैठकीला सहकार्य करण्यावरून कार्यकर्त्यांमध्ये असलेल्या नाराजीवर बोलताना, जिल्हा पालकमंत्री म्हणून कायदा व सुव्यवस्था राखणे ही आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच बेळगाव जिल्ह्याला आणखी एका मंत्रिपदाची गरज असून हायकामांड यावर निर्णय घेईल, असे सांगत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यासोबतचे मतभेद हा आमचा वैयक्तिक विषय असून तो राज्याचा प्रश्न नाही, अशी प्रतिक्रिया सतीश जारकीहोळी यांनी दिली.


Recent Comments