मिरज येथील प्रसिद्ध सचिन हॉस्पिटलच्या टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या वतीने मोफत वंध्यत्व निवारण, स्त्रीरोग आणि पुरुष वंध्यत्व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

मिरज येथील शिवाजी रोडवरील, हॉटेल प्रियदर्शनीजवळ असणाऱ्या रुग्णालयात सामाजिक बांधिलकीच्या जाणिवेतून डॉ. सचिन सुगाणावर यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.

या शिबिराच्या माध्यमातून मूल न झालेल्या दांपत्यांना स्त्री व पुरुष यांच्यातील दोषांविषयी आणि टेस्ट ट्यूब बेबी सारख्या प्रगत तंत्रज्ञानाविषयी सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने आययूआय (IUI) गर्भाशयात प्रक्रिया केलेल्या शुक्राणूंचे रोपण, वीर्यपेढी, स्त्रीबीजदान, गर्भ गोठवून ठेवणे, आयव्हीएफ (IVF), इक्सी (ICSI), इमसी (IMSI) या प्रगत तंत्रज्ञानासह बंद गर्भनलिका सुरू करणे आणि स्त्रीबीज तयार न होणे यावर तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला देण्यात आला.
यासहित पुरुष वंध्यत्व आणि लैंगिक व गुप्तरोगांच्या विविध समस्यांवर आधुनिक उपचारांची माहिती देण्यात आली. तसेच महिलांच्या मासिक पाळीच्या तक्रारी, गर्भाशयाच्या गाठी, अंडाशयाची सूज, यावर दुर्बिणीद्वारे अत्याधुनिक पद्धतीने व कमी खर्चात करावयाच्या शस्त्रक्रियांचे मार्गदर्शन करण्यात आले.
रुग्णालयात आंतरराष्ट्रीय दर्जाची प्रयोगशाळा व तज्ज्ञ डॉक्टरांची टीम उपलब्ध असल्याने उपचाराच्या यशाचा आलेख अधिक आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमाभागातील अनेक रुग्णांना या आधुनिक उपचारांचा व तंत्रज्ञानाचा फायदा झाला असून शिबिरानंतरही गरजू रुग्णांनी या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी डॉ. सचिन (९४२२५८०८४२ / ९७६५०९०८३४) किंवा डॉ. नेहा (९४२१९३२४०९) यांच्याशी संपर्क साधता येईल


Recent Comments