State

कर्नाटकचे विधिमंडळ पावसाळी अधिवेशन ६ ऑगस्टपासून : मुख्यमंत्री

Share

कावेरी पाण्याचा तिढा, तिरुपतीची आरती आणि ६ ऑगस्टपासून सुरू होणारे पावसाळी अधिवेशन याविषयी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी सोमवारी महत्त्वाची माहिती दिली.

कावेरी पाणीप्रश्नी राज्यातील शेतकऱ्यांचे हित आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासोबतच तामिळनाडूला पाणी सोडण्याच्या न्यायालयाच्या आदेशाचे पालन करणेही गरजेचे आहे. यावर येत्या १५ जुलै रोजी कावेरी पाणी व्यवस्थापन मंडळाच्या बैठकीत राज्य सरकार आपली बाजू मांडणार असून, त्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

तिरुपती देवस्थान येथे म्हैसूर महाराजांच्या काळापासून मिळणारी पहिली आरती आता राज्यातील खासदार, आमदार, न्यायाधीश आणि इतर अधिकाऱ्यांना मार्गदर्शक तत्त्वांनुसार दिली जाईल अशी माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिली.

राज्याचे पावसाळी अधिवेशन ६ ऑगस्टपासून सुरू होणार असून, अंतिम तारीख ठरवण्यासाठी मुख्यमंत्री दिल्ली दौरा करणार आहेत. याचवेळी त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिवंगत एच. हनुमंतप्पा यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्र्यांनी दुःख व्यक्त केले.

Tags: