Belagavi

ग्रामपंचायतीमधील विविध कर्मचाऱ्यांची पदोन्नती

Share

बेळगाव जिल्हा पंचायत कार्यालयात आज एक महत्त्वाचा नियुक्ती आदेश पत्र वितरण सोहळा पार पडला. ग्रामपंचायतीमधील एकूण ६२ पात्र कर्मचाऱ्यांना जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्या हस्ते नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले.

ग्रामपंचायतींमधील करवसुलीदार, क्लर्क आणि डेटा एंट्री ऑपरेटर संवर्गातून ग्रामपंचायत ग्रेड-२ सचिव आणि द्वितीय श्रेणी लेखा सहाय्यक पदावर अंतर्गत नियुक्ती मिळालेल्या ६२ कर्मचाऱ्यांना सोमवारी जिल्हा पंचायतीच्या सभागृहात नियुक्ती पत्रांचे वाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे म्हणाले की, ही अंतर्गत नियुक्ती प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक पद्धतीने राबवण्यात आली आहे. गेल्या दोन महिन्यांपासून ही प्रक्रिया सुरू होती, ज्यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची कसून पडताळणी करून ६२ जणांना नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत. आगामी काळातही अशाच प्रकारे पदोन्नती दिली जाईल, असे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी आमदार आसिफ सेठ, वा.क.रा.सा. महामंडळाचे उपाध्यक्ष सुनील हनुमन्नावर, जिल्हा पोलीस प्रमुख के. रामराजन यांच्यासह पंचायत राज विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Tags: