Belagavi

क्रीडा भारती संघटन मंत्री प्रसाद महानकर यांचे मार्गदर्शन.

Share

शास्त्रीनगर येथील विमल फाउंडेशनच्या कार्यालयात क्रीडाभारती बेळगाव संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना क्रीडाभारती अखिल भारतीय संघटनमंत्री प्रसाद मानकर यांनी बैठकीत मार्गदर्शन केले. याप्रसंगी प्रसाद महानकर म्हणाले की आगामी . ६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या क्रीडाज्ञान परिक्षा आणि राष्ट्रीय खेळ नीती ह्यावर चर्चा आणि मार्गदर्शन केल. क्रीडा भारतीचे संघटन महामंत्री प्रसाद महानकर यांनी विविध विषयांवर प्रकाश टाकत स्पोर्ट्स पॉलिसी मधील , एज्युकेशन पॉलिसी, टॅलेंट हंट,खेल आंदोलन खेल नीती या विषयावरती क्रीडाभारती कार्यरत असून आगामी काळात क्रीडा भारतीच्यावतीने क्रीडा क्षेत्रासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तत्पूर्वी क्रीडा भारती बेळगावच्यावतीने जनकल्याण ट्रस्टचे ट्रस्टी लक्ष्मण पवार, किरण जाधव,अशोक शिंत्रे, प्रांतअध्यक्ष अर्जुन पुरस्कार विजेते मुष्टियोद्धा मुकुंद किल्लेकर, उपाध्यक्ष ॲड सुधीर धामणकर, कोषाध्यक्ष परशुराम मंगनाईक, यांच्या हस्ते प्रसाद महानकर यांचे स्वागत करण्यात आले. याप्रसंगी ज्युडोच्या राष्ट्रीय प्रशिक्षका रोहिणी पाटील, संजीव नाईक, एन एन काटकरक्रीडाशिक्षक चंद्रकांत पाटील, उमेश बेळगुंदकर. मयूरी पिंगट, ऐश्वर्या नेसरकर, शुभांगी काकतकर, नकोशा मंगणाकर, सुरज पाटील, संजू नाईक आणि क्रीडाभारतीचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

तसेच आगामी होणाऱ्या क्रीडा भारतीच्या क्रीडाज्ञान परीक्षेमधे बेळगाव जिल्ह्यातून जास्तीत जास्त मुलामुलींनी आणि खेळाडूंनी भाग घ्यावा घेण्यासाठी प्रयत्नशील असणार असे क्रीडाभारती बेळगावच्या वतीने महानकर यांना आश्वासन देण्यात आले.

बेळगांव बेळगाव जिल्हा क्रीडा भारती पदाधिकारी समवेत प्रसाद महानकर, लक्ष्मण पवार, किरण जाधव, अशोक शिंत्रे, मुकुंद किल्लेकर व इतर मान्यवर.

Tags: