Khanapur

चन्नेवाडी गावांसाठी स्वतंत्र मतदान केंद्र आणि स्वतंत्र वॉर्डची मागणी

Share

खानापूर तालुक्यातील चन्नेवाडी येथील ग्रामस्थांनी आपल्या गावांसाठी स्वतंत्र मतदान केंद्र सुरू करावे आणि कसबा नंदगड ग्रामपंचायतीमध्ये चन्नेवाडी गावांसाठी स्वतंत्र वॉर्ड तयार करावा, या मागणीसाठी मतदार नोंदणी अधिकारी बलराम चव्हाण आणि खानापूरचे तहसीलदार दुंडाप्पा कोमार यांना निवेदन दिले आहे.

सुमारे २० ते २५ वर्षांपूर्वी चन्नेवाडी येथील सरकारी प्राथमिक शाळेत मतदान केंद्र होते, जे नंतर भुत्तेवाडी गावात स्थलांतरित करण्यात आले. यामुळे चन्नेवाडीतील मतदारांना, विशेषतः वयोवृद्ध आणि दिव्यांगांना मतदानासाठी लांबचा प्रवास करावा लागत आहे. तसेच, कसबा नंदगड ग्रामपंचायतीमध्ये चन्नेवाडी आणि भुत्तेवाडीचा एकच वॉर्ड असून भुत्तेवाडीची मतदारसंख्या दुप्पट आहे. त्यामुळे चन्नेवाडी गावाला योग्य प्रतिनिधित्व मिळत नसल्याने गावाच्या विकासावर परिणाम होत आहे.

या दोन्ही समस्या सोडवून गावाला न्याय द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याप्रसंगी शामराव के. पाटील, धनंजय रा. पाटील, रणजित शामराव पाटील, परशुराम राटोळकर यांच्यासह गावातील इतर नागरिक उपस्थित होते.

अल्ताफ एम. बसरीकट्टी, इन न्यूज, खानापूर

Tags: