गणेबैल उच्च प्राथमिक मराठी शाळेचे मुख्याध्यापक एस. एल. भक्तुरी यांचा सेवानिवृत्तीनिमित्त सत्कार करण्यात आला. तोपिनकट्टी ग्रामपंचायतीचे माजी उपाध्यक्ष एम. के. गुरव यांच्या अध्यक्षतेखाली हा सेवानिवृत्ती सोहळा पार पडला.

आपल्या सेवाकाळाविषयी बोलताना एस. एल. भक्तुरी यांनी शिक्षकी सेवेतील ३२ वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासात अनेक शाळांमधील सहवास, तिथल्या आठवणी आणि विद्यार्थ्यांच्या सान्निध्यात रममाण होता आले, असे मनोगत व्यक्त केले. वरकड पाटे, जटगे, हारुरी, इदलहोंड, काटगाळी , बरगाव आदी ठिकाणी आपण सेवा बजाविली असून या कार्यकाळात अनेकांनी आपल्याला सहकार्य केल्याचे त्यांनी सांगितले.

या सोहळ्यात बीईओ कार्यालय, विविध शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, एसडीएमसी कमिटी आणि तोपिनकट्टी ग्रामस्थांच्या वतीने एस. एल. भक्तुरी यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव केला.
एल. व्ही. गुरव यांनी प्रास्ताविक व सत्कारमूर्तींचा परिचय करून दिला, तर हणमंत करंबळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या सोहळ्याला प्रभारी बीईओ मंजुनाथ हत्ती, बीआरसी संतोष नाईक, मुख्याध्यापक एस. एन. कम्मार, शिक्षक संघटना उपाध्यक्ष के. एच. कौंदल, कार्यदर्शी बी. बी. चापागांवकर, सदानंद होसूरकर, परशराम कांबळे, सुरेश भातकांडे, मल्लाप्पा वार्णोळकर, निवृत्त मुख्याध्यापक ए. बी. मुरगोड आणि मर्याप्पा पाटील यांच्यासह शिक्षक, शिक्षणप्रेमी नागरिक व विद्यार्थी उपस्थित होते.


Recent Comments