Belagavi

एस. एस. निंगाणी यांनी स्वीकारली बेळगाव डीसीएफ भरारी पथकाची सूत्रे

Share

बेळगाव जिल्ह्याचे वनाधिकारी भरारी पथक म्हणून एस. एस. निंगाणी यांनी नुकतीच आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात आले.

निंगाणी हे मूळचे बेळगावचे असून, यापूर्वी त्यांनी खानापूर, बेळगाव आणि दांडेली आदी ठिकाणी सेवा बजावली आहे. यापूर्वी ते शिर्शी येथे एसीएफ म्हणून कार्यरत होते. नुकतीच त्यांची बेळगाव जिल्ह्याचे डीसीएफ भरारी पथक म्हणून पदोन्नतीने बदली झाली आहे. त्यांच्या कार्यकक्षेत कारवार, धारवाड, गुलबर्गा आणि बेळगाव या क्षेत्रांचा समावेश आहे. निंगाणी यांची बेळगावला पूर्वीच बदली झाली होती, मात्र यल्लापूर आणि बनवासी जंगलातील हजारो कोटींचे अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईमुळे त्यांची बदली काही काळ थांबली होती.

या अतिक्रमण प्रकरणावर उच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर त्यांनी आता बेळगावचा पदभार स्वीकारला आहे. त्यांच्या विशेष प्रयत्नांमुळे शेकडो एकर जमीन वन विभागाला परत मिळवण्यात यश आले होते, अशी माहिती वन विभागाच्या वतीने देण्यात आली.

Tags: