Vijayapura

लग्नासाठी मुलगी मिळत नसल्याने तरुणाचे मोबाईल टॉवरवर आंदोलन

Share

लग्नासाठी मुलगी मिळावी या मागणीसाठी एका तरुणाने बीएसएनएल मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन केल्याची घटना विजापूर जिल्ह्यातील इंडी शहरात घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात काही काळ गोंधळ उडाला होता.

इंडी शहरातील बीएसएनएल मोबाईल टॉवरवर चढून हा तरुण लग्नासाठी मुलगी पाहिजे अशी मागणी करत ओरडत होता. या तरुणाचे नाव आणि पत्ता अद्याप समजू शकलेला नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी त्याला पाहण्यासाठी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.

याबाबत माहिती मिळताच इंडी शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी योग्य ती कारवाई करत या तरुणाला सुरक्षितपणे टॉवरवरून खाली उतरवले. ही घटना इंडी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

Tags: