बॉलीवूडचे प्रसिद्ध अभिनेते गोविंदा १४ जुलै रोजी विजापूर दौऱ्यावर येत आहेत. शहरातील दुर्गादेवी वार्षिकोत्सवात ते विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून, त्यांच्या या दौऱ्यामुळे चाहत्यांमध्ये मोठा उत्साह आहे.

अभिनेते गोविंदा यांनी आपल्या विजापूर दौऱ्याबाबत आनंद व्यक्त केला आहे. विजापूरमधील सर्वांना नमस्कार, दुर्गादेवी सर्वांचे भले करो आणि प्रत्येकाचे जीवन सुख-समृद्धीने समृद्ध होवो, अशी प्रतिक्रिया गोविंदा यांनी दिली. गोविंदा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सध्या कार्यक्रमाची तयारी वेगाने सुरू असून, या सोहळ्याला नागरिक आणि चाहत्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.



Recent Comments