Belagavi

बेळगावात जलजीवन मिशनचे नळ चोरीला

Share

बेळगाव तालुक्यातील अलरवाड गावात चोरांनी धुमाकूळ घालत सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘जलजीवन मिशन’ योजनेच्या नळांवर डल्ला मारला आहे. गावातील अडवी गल्लीत घरोघरी बसवण्यात आलेले नळ एकाच रात्रीत चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे.

अडवी गल्लीतील सुमारे ५० ते ६० घरांसमोरील पाण्याच्या नळांची चोरी झाली आहे. नळ बसवताना योग्य प्रकारे हे नळ बसवण्यात न आल्यामुळे हे नळ सहज उपटून नेता आले असा आरोप स्थानिकांनी केला आहे

सकाळी गावकऱ्यांनी पाहिले असता नळ गायब होते आणि पाणी वाया जात होते. कंत्राटदाराचे निकृष्ट काम आणि चोरांच्या त्रासामुळे गावकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Tags: