कृष्णा नदीला आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या गावांमध्ये मगरींचा वावर वाढला असून मांजरीवाडी-येडूरवाडीला जोडणाऱ्या पुलाजवळ पाच ते सहा फूट लांबीची मोठी मगर दिसून आली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये कमालीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत सतत वाढ होत आहे. या पुराच्या पाण्यासोबत वाहून आलेली ही मगर नदीच्या काठावर विसावली असल्याचे स्थानिक लोकांच्या निदर्शनास आले. नदीकाठावर मगर बसलेली असताना गावकऱ्यांनी हे दृश्य आपल्या मोबाईल फोनमध्ये कैद केले असून हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पुराचे पाणी वाढत असल्याने मगरी निवासी भाग आणि शेतजमिनींकडे सरकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे नदीकाठचे शेतकरी आणि त्यांच्या पाळीव जनावरांना मोठा धोका निर्माण होऊ शकतो, अशी चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने या ठिकाणी धाव घेऊन मगरीला सुरक्षितपणे पकडावे आणि तिची रवानगी इतरत्र करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.


Recent Comments