मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच बेळगाव दौऱ्यावर आलेल्या डी. के. शिवकुमार यांनी शहरातील एका खाजगी हॉटेलमध्ये काँग्रेस आमदार आणि प्रमुख नेत्यांसाठी विशेष स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. या राजकीय मेजवानीने सध्या राजकीय वर्तुळात सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.

मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या हायप्रोफाइल डिनर मीटिंगला जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जารकीहोळी प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांच्यासोबत आमदार राजू कागे, महांतेश कौजळगी, विश्वास वैद्य, प्रसाद अब्बय्या, श्रीनिवास माने, यासीर खान पठाण, अशोक पट्टण, बाबासाहेब पाटील, माजी आमदार अंजली निंबाळकर, आमदार चन्नराज हट्टीहोळी आणि सतीश जारकीहोळी यांचे सुपुत्र राहुल जारकीहोळी यांच्यासह अनेक प्रमुख नेते उपस्थित होते.

मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच कुंदनगरी बेळगावात आलेल्या डी. के. शिवकुमार यांनी या स्नेहभोजनाच्या निमित्ताने जिल्ह्यातील सर्व नेत्यांना एकत्र आणले. या वेळी सद्य राजकीय घडामोडी आणि जिल्ह्याच्या विकासकामांबाबत नेत्यांमध्ये महत्त्वपूर्ण चर्चा झाल्याचे बोलले जात आहे.


Recent Comments