Belagavi

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे डॉ. अंजली निंबाळकर यांच्याकडून भव्य स्वागत

Share

बेळगाव जिल्ह्यामध्ये पहिल्यांदाच आगमन झालेले मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांचे खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी या दोन्ही वरिष्ठ नेत्यांचे विमानतळावर स्वागत केले.

मुख्यमंत्री पदाची धुरा सांभाळल्यानंतर डी. के. शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर हे पहिल्यांदाच बेळगावात आले असता सांबरा विमानतळावर त्यांचे जोरदार स्वागत झाले. माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी दोन्ही नेत्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आदरातिथ्य केले. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी डॉ. अंजली निंबाळकर यांच्याशी संवाद साधला, तसेच आगामी काळात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या सूचना देत सविस्तर चर्चा केली.

Tags: