Chikkodi

चिक्कोडी तालुक्यात मुसळधार पावसामुळे घराची भिंत कोसळली

Share

चिक्कोडी तालुक्यातील वडराळ गावात सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे एका घराची भिंत शेजारील पत्राशेडवर कोसळली. या दुर्घटनेत एका म्हशीचा जागीच मृत्यू झाला असून तीन जनावरे गंभीर जखमी झाली आहेत.

स्थानिक रहिवासी लक्ष्मण अडिवेप्पा कंठीबाळी यांच्या घराची भिंत रविवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे अचानक कोसळली. लक्ष्मण यांनी आपली जनावरे शेजारील पत्राशेडमध्ये बांधली होती. भिंत कोसळल्याने ढिगाऱ्याखाली चिरडून एका म्हशीचा मृत्यू झाला, तर अन्य एक म्हैस आणि दोन बैल गंभीर जखमी झाले.

या दुर्घटनेत जखमी झालेल्या जनावरांवर सध्या स्थानिक पशुवैद्यांमार्फत उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे लक्ष्मण कंठीबाळी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, प्रशासनाने या गरीब शेतकरी कुटुंबाला तातडीने योग्य भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ही घटना चिक्कोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.

Tags: