बेळगाव वारकरी महासंघाची भव्य आषाढी दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली आहे. बेळगावच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विधिवत पूजा करून हा दिंडी सोहळा मार्गस्थ झाला असून यंदाचे याचे ३३ वे वर्ष आहे.


महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यांतील वारकऱ्यांना एकत्र आणणाऱ्या या दिंडीचे मुख्य प्रस्थान ८ जुलै रोजी आळंदीतून होणार आहे. ‘दिंडी क्रमांक ४’ अंतर्गत बेळगाव भागातील सुमारे ७०० ते ८०० वारकरी यात भक्तीभावाने सहभागी होणार आहेत.


या दिंडी सोहळ्यातील भाविकांसाठी महासंघाचे प्रमुख एस. आर. पाटील यांच्यातर्फे मोफत भोजन आणि निवासाची सोय करण्यात आली आहे. महाद्वार रोडवरील मंदिरापासून ५ वाहनांच्या ताफ्यासह ही दिंडी निघाली असून यावेळी महासंघाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments