बेळगाव – येथील श्री काळभैरवनाथ मंदिर शहापूर,नाथपंथी रावळ समाजाच्या वतीने आज रविवारी कर्नाटक, महाराष्ट्र व गोवा राज्यातील नाथपंथी रावळ समाजाचे पहिले एकदिवसीय अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनाला उपस्थित तीनही राज्यातील मान्यवरांनी समाजाच्या सर्वांगीण प्रगतीचा संकल्प एकमुखाने व्यक्त केला.

नाथ पै चौक शहापूर खडेबाजार येथील श्री अंबाबाई मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या अधिवेशनाच्या व्यासपीठावर अध्यक्षस्थानी परशुराम चव्हाण यांच्यासह कल्लाप्पा रावळ, विजय नाईक, हनुमंत हणगी (हुबळी), बी नागराज (बेंगळुरू), कुमार रावळ (मिरज) प्रमोद रावळ (इचलकरंजी), एम थोटप्पा (शिवमोगा),तवनाप्पा रावळ (बनहट्टी),सोमनाथ गंधवाले (युवा अध्यक्ष), शिवराम जोगी (मुर्डेश्वर), सिद्धाप्पा बावली, मंजुनाथ हाणगी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. या अधिवेशनात व्यासपीठावरील मान्यवरांसह श्री काळभैरवनाथ मंदिराचे देणगीदार, नाथपंथी रावळ समाजातील जेष्ठ तसेच श्री काळभैरवनाथ मंदिर ट्रस्ट पदाधिकाऱ्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शाल,पुष्पहार स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. माजी आमदार संजय पाटील, शहापूर पोलीस ठाण्याचे सीपीआय सीमानी, प्रसिद्ध कर सल्लागार संदीप खन्नुकर यांनीही अधिवेशनाला विशेष निमंत्रित म्हणून उपस्थिती दर्शविली.

अधिवेशनात नाथपंथी रावळ समाज विविध जाती समुदायात विखुरला गेला आहे. त्या समाजाने एकच जात लावल्यास समाजाची प्रगती होणार आहे. शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यात सोयीचे ठरणार आहे. या संदर्भात सर्वानुमते निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर तीन राज्यांच्या सीमेवर असल्याने रावळ समाजाचे संपर्क केंद्रबिंदू शहर म्हणून बेळगाव शहराची निवड करण्यात आली. समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी तिन्ही राज्यातील समाज बांधवांनी एकत्र यावे. विचारांचे आदान प्रदान व्हावे. समाजातील विविध प्रमुख विषयांवर चर्चा घडावी. यासाठी प्रत्येक वर्षी प्रत्येक राज्यात अधिवेशन घेण्यास सर्वांनी सहमती दर्शविली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थितांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. स्वागत आणि प्रास्ताविक मंदिर विश्वस्त कमिटीचे अध्यक्ष आणि माजी महापौर महेश नाईक यांनी केले. आभार प्रदर्शन ट्रस्ट कमिटीचे सेक्रेटरी विजय नाईक यांनी केले. सूत्रसंचालन मंजुनाथ चव्हाण यांनी केले.


Recent Comments