विजापूर-हुबळी राष्ट्रीय महामार्गावरील कोर्ती-कोलदार पुलावरून कृष्णा नदीत कोसळलेल्या टिप्परमधील बेपत्ता चालकाचा शोध घेण्यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर शोधमोहीम राबवली आहे. नदीच्या दरीतून टिप्पर बाहेर काढण्यात यश आले असून आता चालकाचा शोध घेतला जात आहे.


बुधवारी संध्याकाळी हा अपघात झाला होता. कारला धडक दिल्यानंतर नियंत्रण सुटून टिप्पर पुलाची भिंत तोडून नदीत कोसळला. यामध्ये बागलकोट तालुक्यातील बेण्णूर गावातील चालक संतोष कोटी बेपत्ता झाला असून, क्लिनर संजू मुळगे याला स्थानिक मच्छीमारांनी सुखरूप बाहेर काढले होते. पोलीस, अग्निशामक दल आणि स्थानिक मच्छीमार बोटीच्या साहाय्याने चालक संतोष कोटी याचा शोध घेत आहेत. शनीवारीही ही मोहीम सुरू राहणार आहे.



Recent Comments