विजापूर जिल्ह्यातील चडचण शहरातील बाहुबली कापड दुकानाच्या समोर टिप्पर आणि ट्रक दरम्यान झालेल्या अपघातात दुचाकी चालकाचा जागीच मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे.


अपघातातील मृत पुरुष आणि जखमी झालेल्या महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. हे दोघे पती-पत्नी असावेत, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. जखमी महिलेला स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ रुग्णालयात हलवण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत.

चडचण पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला आहे. मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून या अपघातप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Recent Comments