Belagavi

बेळगाव पोलिसांकडून कृत्रिम बुद्धिमत्तेचा यशस्वी वापर

Share

विविध कारणांमुळे घर सोडून गेलेल्या आणि अनेक वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी बेळगाव पोलिसांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर केला आहे.

बेळगाव येथे पत्रकारांशी बोलताना जिल्हा पोलीस अधीक्षक के. रामराजन यांनी स्पष्ट केले की, कौटुंबिक वाद किंवा वैयक्तिक कारणांमुळे बेपत्ता झालेल्या लोकांचा शोध घेण्यासाठी आता पारंपरिक तपासासोबतच आधुनिक तंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरत आहे. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गेल्या १० वर्षांत बेपत्ता झालेल्या १२ व्यक्तींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे.

बेपत्ता व्यक्तींची छायाचित्रे डिजिटल डेटाबेसमध्ये समाविष्ट करून, देशाच्या कोणत्याही भागात त्यांनी सरकारी योजनांसाठी किंवा ओळखपत्रांसाठी ऑनलाइन अर्ज केल्यास त्या माहितीची पडताळणी केली जाते. या तंत्रज्ञानामुळे बेळगावातून बेपत्ता झालेले काही लोक गुजरात आणि उत्तर प्रदेशमध्ये आढळून आले. नवीन कागदपत्रांच्या आधारे त्यांचा सुगावा लागताच पोलिसांनी त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबाकडे कुटुंबाकडे सुखरूप पोहोचवण्याचे कार्य केले आहे.

Tags: