येळ्ळूरच्या हनुमंतगौड नगरमधील रहिवाशांना अनेक दिवसांपासून भेडसावणाऱ्या वीज समस्येचे अखेर कायमस्वरूपी निवारण झाले आहे. माजी ग्रामपंचायत अध्यक्ष सतीश पाटील यांनी पुढाकार घेत हेस्कॉम अधिकाऱ्यांशी चर्चा करून ही समस्या मार्गी लावली.

स्थानिक नागरिकांनी आपली अडचण मांडल्यानंतर सतीश पाटील यांनी तत्परतेने हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला आणि आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून कामाला मंजुरी मिळवून दिली. या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांच्या घरापासून उमेश पाटील यांच्या घरापर्यंत वीज वितरण कंपनीच्या वतीने ७ नवीन सिमेंट खांब उभारून त्यावर पथदिवे लावण्यात आले आहेत.

यापूर्वी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाचा उर्वरित भाग आता यशस्वीपणे पूर्ण करण्यात आला आहे. यामुळे हनुमंतगौड नगरमधील नागरिकांनी आणि ग्रामस्थांनी माजी अध्यक्ष सतीश पाटील यांचे मनापासून आभार मानले आहेत.


Recent Comments