खानापूर तालुक्यात भारत निवडणूक आयोगाच्या वतीने विशेष मतदार यादी पुनरिक्षण मोहीम सुरू करण्यात आली असून नागरिकांनी या प्रशासकीय प्रक्रियेला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन भारतीय जनता पक्षाच्या वतीने करण्यात आले आहे.

तालुक्यातील ३१२ मतदान केंद्रांवर मतदान केंद्र अधिकाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन मतदारांच्या माहितीची अचूकता तपासण्याचे काम सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर आयोजित पत्रकार परिषदेत आमदार विठ्ठल हलगेकर यांनी मतदार यादीतील दुहेरी नावे हटवून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले.

याच वेळी, नुकत्याच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत आपण क्रॉस व्होटिंग केल्याच्या समाज माध्यमांवरील चर्चा पूर्णपणे खोट्या असून ही आपली मानहानी करणारी अपप्रचार मोहीम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या मोहिमेत सर्व नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन माजी आमदार अरविंद पाटील आणि पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केले आहे.


Recent Comments