विजापूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी येथील हेस्कॉमचे कार्यकारी अभियंता सिद्राम बिरादार हे लाच स्वीकारताना लोकायुक्त अधिकाऱ्यांच्या जाळ्यात अडकले आहेत.

विकासकामांचे २ लाख रुपयांचे बिल मंजूर करण्यासाठी १५ हजार रुपयांची लाच मागितल्याच्या या आरोपावरून बेंगळुरू लोकायुक्त अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली. विजापूर जिल्ह्यातील बसवन बागेवाडी येथील संतोषकुमार हुलसूर यांनी या संदर्भात बेंगळुरू लोकायुक्त कार्यालयात तक्रार दाखल केली होती. तक्रारीची शहानिशा केल्यानंतर लोकायुक्त पथकाने सापळा रचला.

ठरल्यानुसार २ लाख रुपयांचे बिल काढण्यासाठी सिद्राम बिरादार यांनी १५ हजार रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी पहिला हप्ता म्हणून ५ हजार रुपये त्यांनी स्वीकारले होते, तर उर्वरित १० हजार रुपये स्वीकारताना लोकायुक्त अधिकाऱ्यांनी त्यांना रंगेहात अटक केली. बेंगळुरू लोकायुक्त डीवायएसपी पुट्ट ओबळरेड्डी आणि वसंत यांच्या नेतत्वाखाली ही कारवाई झाली. आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना बेंगळुरू लोकायुक्त विशेष न्यायालयात हजर केले जाईल.


Recent Comments