Uncategorized

बेळगावात एसआयआर प्रक्रियेविरोधात विरोधकांचा एल्गार

Share

राज्य निवडणूक आयोगाची एसआयआर प्रक्रिया अधिक लोकशाहीभिमुख आणि पारदर्शक करावी, तसेच नागरी संघटनेच्या मागण्यांवर स्पष्टीकरण द्यावे या मागणीसाठी बेळगावात विविध धर्मनिरपेक्ष पक्षांच्या वतीने मंगळवारी तीव्र आंदोलन करण्यात आले.

बेळगाव शहरात एकत्र आलेल्या कार्यकर्त्यांनी सध्याच्या एसआयआर प्रक्रियेमध्ये जनतेच्या सूचना आणि मतांना योग्य महत्त्व दिले जात नसल्याचा आरोप केला. मतदारांचे हक्क अबाधित राखण्यासाठी या संपूर्ण प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्याची मागणी आंदोलकांनी केली. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. निवडणूक प्रक्रिया पूर्णपणे न्याय्य, पारदर्शक आणि जनतेच्या हिताची असावी, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

मतदार ओळखपत्र मिळवण्यात येणाऱ्या अडचणींमुळे विशेषतः स्थलांतरित मजूर आणि गरीब वर्गाची गैरसोय होत असून, आवश्यक कागदपत्रे सादर करण्यासाठी त्यांना अधिक मुदत मिळणे गरजेचे आहे अशी प्रतिक्रिया मंदा नेवगी यांनी दिली.

या आंदोलनात विविध पक्षांचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: