खानापूर शहराला पुरवठा करणार्या पाण्याच्या जलकुंभाची स्वच्छता व किरकोळ दुरूस्तीचे काम नगर
पंचायतीच्यावतीने घेण्यात येणार आहे.
यानिमित्त गुरूवारी दि.२ जुलै ते सोमवारी दि.६ जुलै पर्यत खानापूर शहरातील नियमित पाणी पुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. अशी माहिती खानापूर नगरपंचायतीचे चीफ आँफिसर संतोष कुरबेट यानी दिली आहे.

यावेळी पाच दिवसाच्या कालावधीत शहरातील नागरीकांनी पिण्यासाठी कुपनलिकेचे पाणी उकळुन व थंड करून वापरावे.तसेच इतर दैनंदिन गरजासाठी कुपनलिकेच्या पाण्याचा वापर करून सहकार्य करावे.असे आवाहन नगरपंचायतीच्या करण्यात आले आहे.
याकाळात पाण्याचा साठा आवश्यक तेवढा करून घेऊन नगरपंचायतीला सहकार्य करावे.असे आवाहन करण्यात आले आहे.



Recent Comments