बेळगाव शहरातील बसवण गल्ली परिसरातील समर्थ नगर येथील एका अपार्टमेंटमध्ये भरदिवसा एका अज्ञात व्यक्तीने प्रवेश करून वाळत घातलेले कपडे चोरण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे.

२५ जून रोजी दुपारी एका संशयित व्यक्तीने अपार्टमेंटमध्ये प्रवेश करत तिथे वाळत घातलेले कपडे काढण्याचा प्रयत्न केला. मात्र इतरांची चाहूल लागताच त्याने तिथून तातडीने पळ काढला. ही संपूर्ण घटना अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून स्थानिक रहिवासी आणि सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुडवेकर यांनी खडे बाजार पोलीस ठाण्यात यासंबंधी तक्रार दाखल केली आहे.

अपार्टमेंटमध्ये मोठ्या संख्येने महिला आणि मुले राहत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव संशयित व्यक्तीचा शोध घेऊन तातडीने पोलीस बंदोबस्त वाढवावा, अशी मागणी रहिवासी करत आहेत. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संशयिताचा शोध सुरू केला असून पुढील तपास सुरू आहे.


Recent Comments