Belagavi

बेळगावात सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या दोघांना अटक

Share

बेळगाव शहरातील सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे मद्यप्राशन करणाऱ्यांवर उद्यमबाग पोलिसांनी कडक कारवाई सुरू केली असून, काल अशाच एका कारवाईत खुल्या जागेत दारू पिणाऱ्या दोघांना पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे.

येथील सर्वो कंट्रोल फॅक्टरीजवळ ही कारवाई करण्यात आली. अटकेत असलेल्यांमध्ये तानाजी गल्ली येथील यल्लाप्पा भरमाप्पा नाईक आणि अनगोळ येथील आनंद दीपक पाटील यांचा समावेश आहे. उद्यमबाग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण बिरादार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे ही धाड टाकली. या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून मद्याच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकचे ग्लास आणि पाण्याच्या बाटल्या जप्त केल्या आहेत.

सध्या या आरोपींविरुद्ध उद्यमबाग पोलीस ठाण्यात अबकारी कायद्याच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. या यशस्वी कारवाईबद्दल बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.

Tags: