Belagavi

बेळगावात कारमधून गांजा विक्री करणाऱ्या हुबळीच्या तस्कराला अटक

Share

बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पथकाने कारमधून गांजाची विक्री करणाऱ्या हुबळी येथील आंतरजिल्हा तस्कराला शिताफीने अटक केली आहे.

येथील व्हीटीयू क्रॉस जवळील जांबोटी-बेळगाव रस्त्यावरील मच्छे भागात सार्वजनिक ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. कारमधून गांजा विकणाऱ्या निखील मायकल डेव्हिड (वय ३७, रा. केशवापूर, हुबळी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस उपनिरीक्षक व्ही. डी. सरनायक आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केली.

या कारवाईदरम्यान पोलिसांनी आरोपीकडून १६८ ग्रॅम गांजा, एक कार आणि मोबाईल फोन असा एकूण ७ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सध्या आरोपीविरुद्ध बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या यशस्वी कामगिरीबद्दल बेळगाव शहराचे पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.

Tags: