कर्नाटक राज्य वकील परिषदेच्या निवडणुकीत बेळगावचे ज्येष्ठ वकील आय. एम. पाटील यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला असून वकिलांच्या वतीने शहरात विजयोत्सव साजरा करण्यात आला.


कर्नाटक राज्य वकील परिषदेच्या निवडणुकीत बेळगावचे आय. एम. पाटील हे सर्वाधिक मतांनी निवडून आल्याबद्दल शहरात भव्य विजयोत्सव साजरा करण्यात आला. बेळगाव बार असोसिएशनच्या सदस्यांनी कित्तूर राणी चन्नम्मा चौकातील गणेश मंदिरात विशेष पूजा केली. त्यानंतर फटाके फोडून आणि मिठाई वाटून आनंद साजरा केला. तसेच चेन्नम्मा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पाटील यांच्या निवडीमुळे वकिलांच्या समस्या सुटतील असा विश्वास व्यक्त केला.

या ऐतिहासिक विजयानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आय. एम. पाटील यांनी निवडणुकीत पाठिंबा दिल्याबद्दल संपूर्ण राज्यातील वकील बांधवांचे आभार मानले. वकिलांची सेवा करण्याची मिळालेली ही संधी सार्थ ठरवून, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि कल्याणासाठी आपण नेहमी कटिबद्ध राहू, अशी ग्वाही त्यांनी दिली. या कार्यक्रमाला बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि अनेक वकील उपस्थित होते.


Recent Comments