Belagavi

बेळगावात एसआयआर मोहिमेबाबत विद्यार्थ्यांची जनजागृती रॅली

Share

भारत आणि कर्नाटक निवडणूक आयोग, बेळगाव जिल्हा पंचायत तसेच शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी बेळगाव शहरात मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR) मोहिमेबाबत जनजागृती रॅली काढण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरू झालेली ही रॅली शहरातील प्रमुख रस्त्यांवरून काढण्यात आली. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी मतदार यादीतील दुरुस्ती, नवीन मतदार नोंदणी आणि मतदानाचे महत्त्व याविषयी घोषणा देत नागरिकांमध्ये जनजागृती केली. मतदार यादीत नाव नोंदवणे, नावात सुधारणा करणे आणि नाव बदलणे या प्रक्रियेची माहिती याद्वारे देण्यात आली.

या रॅलीत शिक्षण विभागाचे अधिकारी, शिक्षक आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते. लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी प्रत्येक पात्र नागरिकाने मतदार म्हणून नोंदणी करणे आवश्यक असल्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. तसेच या विशेष पुनरिक्षण मोहिमेला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहनही प्रशासनातर्फे करण्यात आले.

Tags: