Belagavi

बेळगाव शहरात धावत्या कारला भीषण आग; संपूर्ण वाहन जळून खाक

Share

बेळगाव शहरात रस्त्यावरून धावणाऱ्या एका कारला अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. कारमधील प्रवाशांनी दाखवलेल्या समयसुचकतेमुळे मोठी जीवितहानी टळली असून सर्वजण सुखरूप बाहेर पडले आहेत.

बेळगाव पासिंग असलेली एक स्विफ्ट कार रामदेव हॉटेलसमोरील डी-मार्ट कॉर्नर रस्त्यावरून जात असताना, इंजिनमध्ये शॉर्ट सर्किट होऊन अचानक आग लागली. धोका ओळखून चालकाने तात्काळ कार बाजूला थांबवली आणि आतील सर्व प्रवाशांना बाहेर काढले. पाहता पाहता आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण कार जळून खाक झाली.

या घटनेमुळे मुख्य रस्त्यावर काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. घटनेची माहिती मिळताच माळमारुती पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पोलीस आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्निशामक दलाने शर्थीचे प्रयत्न करून कारला लागलेली आग पूर्णपणे आटोक्यात आणली.

Tags: