बेळगाव जिल्ह्यातील चिक्कोडी तालुक्यातील जोडकुरळी गावात दुकानाचे शटर बंद करताना विजेचा धक्का लागून एका २८ वर्षीय टायर दुकानदाराचा जागीच मृत्यू झाला.

जोडकुरळी गावात टायर दुकान चालवणारे पवन माने हे नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद करत होते. यावेळी जुनी वायरिंग किंवा शॉर्ट सर्किटमुळे दुकानाच्या लोखंडी शटरमध्ये वीजप्रवाह उतरला. शटर ओढत असताना पवन यांना विजेचा तीव्र धक्का लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

या दुर्घटनेनंतर स्थानिक ग्रामस्थांनी वीज वितरण कंपनीच्या म्हणजेच हेस्कॉमच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. जुन्या वीज वाहिन्यांची योग्य देखभाल न केल्यामुळेच हा अपघात झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे.


Recent Comments