बेळगाव येथील रंगसृष्टी सांस्कृतिक संस्थेच्या वतीने आयोजित विशेष समारंभात प्राध्यापक डॉ. एच. बी. कोलकार यांनी मुख्य व्याख्याते म्हणून मार्गदर्शन केले.


बेळगावमधील राणी चन्नम्मा चौकाजवळील कन्नड साहित्य भवनात झालेल्या या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक डॉ. पी. जी. केम्पण्णावर आणि शिरीष जोशी यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले.

कन्नड साहित्याने जैन, वीरशैव आणि ब्राह्मण साहित्याच्या माध्यमातून समाजात नेहमीच समन्वयाची आणि एकतेची भावना जोपासली आहे, असे मत मुख्य व्याख्याते एच. बी. कोलकार यांनी यावेळी व्यक्त केले. बुद्ध, बसवेश्वर आणि महात्मा गांधी यांनी भगवान महावीरांचाच मार्ग अनुसरला होता, असा संदर्भही त्यांनी यावेळी दिला.
या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बसवराज जगजंपी, एल. एस. शास्त्री, ज्येष्ठ लेखिका डॉ. गुरुदेवी हुल्लेप्पनवरमठ, रंगसृष्टी संस्थेचे अध्यक्ष रमेश जंगल, उपाध्यक्ष शैलजा भिंगे, एम. के. हेगडे, कोषाध्यक्ष शांता आचार्य आणि सचिव शरणगौडा पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments