आंतरराष्ट्रीय अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त बेळगाव जिल्हा पोलिसांनी युवा पिढीला व्यसनाधीनतेपासून वाचवण्यासाठी जिल्हाभर राबवलेल्या व्यापक जनजागृती सप्ताहाची यशस्वी सांगता झाली .


२२ ते २६ जून दरम्यान बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली बैलहोंगल, रामदुर्ग, गोकाक, चिकोडी आणि अथणी उपविभागात भव्य रॅली व जनजागृती सभा झाल्या. यामध्ये हजारो विद्यार्थी, शिक्षक व नागरिकांनी सहभाग घेतला, तर गोकाक आणि चिकोडी येथील रॅलीत ५०० हून अधिक विद्यार्थी सामील झाले होते.


अमली पदार्थांमुळे व्यक्ती, कुटुंब आणि समाज उद्ध्वस्त होतो, हा संदेश देत पोलिसांनी बेळगावला ‘ड्रग्जमुक्त’ करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य मागितले आहे. अवैध विक्रीची माहिती देणाऱ्याचे नाव पूर्णपणे गोपनीय ठेवले जाईल, असे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दिले आहे.


Recent Comments