Belagavi

हारूगेरी पोलिसांकडून तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे बेपत्ता व्यक्तीचा शोध

Share

बेळगाव जिल्ह्यातील हारूगेरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून २०२० मध्ये बेपत्ता झालेल्या एका व्यक्तीचा पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून यशस्वीरीत्या शोध घेतला आहे. कौटुंबिक वादातून घर सोडून गेलेला हा व्यक्ती विजापूर येथे सुखरूप आढळून आला.

जमखंडी येथील रहिवासी गुरुपाद इंचगेरी हे २०२० मध्ये अचानक बेपत्ता झाले होते. सुरुवातीच्या तपासात त्यांचा कोणताही सुगावा न लागल्याने पोलिसांनी हे प्रकरण बंद केले होते. मात्र, नुकतेच पोलिसांनी तांत्रिक मुद्यांचा आधार घेत पुन्हा तपास केला असता, सदर व्यक्ती विजापूर शहरात राहत असल्याचे समोर आले.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत, पत्नीसोबत झालेल्या मतभेदामुळे आपण स्वतःहून घर सोडून निघून गेल्याचे गुरुपाद यांनी सांगितले. हारूगेरी पोलिसांच्या या कामगिरीचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

Tags: