Belagavi

दांडेलीतील ‘सिल्व्हर बील रिसॉर्ट’चे बुकिंग आता बेळगावात उपलब्ध

Share

उत्तर कर्नाटकातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या दांडेली येथे जाणाऱ्या पर्यटकांसाठी बेळगावातच बुकिंगची सोय उपलब्ध करण्यात आली आहे. दांडेलीतील नवीन ‘सिल्व्हर बील रिसॉर्ट’च्या बुकिंग प्रक्रियेचा बेळगावात शुभारंभ करण्यात आला असून पर्यटकांना याचा लाभ घेता येणार आहे.

उत्तर कन्नड जिल्ह्यातील निसर्गरम्य आणि काली नदीच्या किनाऱ्यावर महांतेश काकतीकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ‘सिल्व्हर बील रिसॉर्ट प्रायव्हेट लिमिटेड’ची सुरुवात केली आहे. या रिसॉर्टच्या बुकिंगसाठी पर्यटकांना दांडेलीला जाण्याची गरज नसून, बेळगावातील संकपाळ कॅफे येथे थेट बुकिंगची व्यवस्था करण्यात आली आहे. महांतेश काकतीकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून माजी आमदार महांतेश कवटगीमठ आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या सुविधेचे उद्घाटन करण्यात आले.

दळणवळणाच्या आणि धावपळीच्या जीवनातून वेळ काढून कुटुंबासह निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्यासाठी हे रिसॉर्ट उत्तम पर्याय असल्याचे मान्यवरांनी म्हटले आहे. काली नदीचे सौंदर्य आणि विविध पक्षी पाहण्याची आवड असणाऱ्या बेळगावातील पर्यटकांसाठी ही स्थानिक बुकिंग सुविधा अत्यंत सोयीची ठरेल, असा विश्वास रिसॉर्टच्या संचालकांनी व्यक्त केला आहे.

Tags: