Belagavi

फेडरेशन चषक अरबाज खान ‘चॅम्पियन ऑफ चौम्पियन्स’

Share

बेळगाव : इंडियन बॉडी बिल्डर्स फेडरेशनतर्फे पंजाबमधील लुधियानामध्ये आयोजित पंधराव्या फेडरेशन यषक बॉडीबिल्डिंग अँड फिजिक्स स्पोर्ट्स चैंपियनशिप २०२६ मध्ये महाराष्ट्राने आपल्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पुरुष गटाचे सांधिक विजेतेपद पटकावले. महिला गटात बेळगावच्या केतकी पाटीलने कांस्यपदक जिंकले.मध्य प्रदेशचा अरबाज खान ‘चॅम्पियन ऑफ चौम्पियन्स’ ठरला.

पुरुष गटात महाराष्ट्राने सर्वाधिक १८० गुणांसह अव्वल स्थान पटकावले. उत्तराखंडने (१७५ गुण) उपविजेतेपद मिळविले. महिलांच्या गटात अरुणाचल प्रदेशने विजेतेपद तर सिक्कीमने उपविजेतेपद पटकावले. ८५ किलो वजनी गटात अरबाजने अंतिम फेरीत इतर सर्व गटांतील विजेत्यांना मागे टाकत बहुमान मिळवला. ८५ किलो वजनी गटात हरियाणाच्या नवीन याने दुसरा आणि छत्तीसगडच्या पोथुबार्की आनंद राव याने तिसरा क्रमांक पटकावला.

२० किलो वजनी गटात महाराष्ट्राच्या सय्यद हबीबने सुवर्णपद‌काला गवसणी घातली. चंदीगडच्या राहुल सिंग चौहानने दूसरा तर ओरिसाच्या रश्मेिरंजन साहूने तिसरा क्रमांक मिळवला. २० किलोवरील गटात मध्य प्रदेशच्या प्रदीप ठाकूरने बाजी मारली. पश्चिम बंगालचा बिट्ट साहा द्वितीय तर उत्तराखंडचा प्रशांत वीर सिंग तृतीय स्थानाचा मानकरी ठरला. मेन्स अॅथलेटिक फिजिक्स गटात महाराष्ट्राच्या चंदन माधुरीने आपल्या पिळदार शरीरयष्टीचे प्रदर्शन करत प्रथमक्रमांक मिळवला.

दिल्लीचा सरताज आणि पश्चिम बंगालचा दिलीप कुमार रॉय अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या स्थानावर राहिले. ६५ किलो गटात कर्नाटकच्या ऋषभ वसिष्ठने चौथा क्रमांक मिळवला. अन्य स्पर्धकांना यश मिळू शकले नाही. महिला गटात बेळगावच्या केतकी पाटीलने तिसरे स्थान मिळविले. खुशबू यादवने प्रथम तर भूमिका कुमारने दुसरे स्थान पटकावले. महाराष्ट्राच्या ग्रंथाली राहिली. हांडे चौथ्या स्थानावर

Tags: