Belagavi

बेळगाव मनपा महसूल कर्मचारी संघटनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची निवड

Share

बेळगाव महानगरपालिकेच्या दक्षिण ०१ महसूल शाखेत एक महत्त्वाची बैठक पार पडली. उपायुक्त सिद्धू हुल्लोळी यांच्या उपस्थितीत कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणींवर चर्चा करण्यात आली असून, याच वेळी महसूल शाखेच्या नवीन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.

महानगरपालिकेचे उपायुक्त सिद्धू हुल्लोळी यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण ०१ महसूल शाखेच्या कर्मचाऱ्यांच्या समस्यांबाबत सविस्तर बैठक घेऊन त्या सोडवण्याचे आश्वासन देण्यात आले. याच बैठकीत महसूल कर्मचारी संघटनेची नवीन कार्यकारिणी अधिकृतपणे जाहीर करण्यात आली.

संघटनेच्या नवीन अध्यक्षपदी यल्लेश बच्चलपुरी, उपाध्यक्षपदी संतोष ओसी, सरचिटणीसपदी सागर कांबळे, चिटणीसपदी भरत कोलकार आणि खजिनदार म्हणून एस. एस. पाटील यांची निवड झाली आहे. यासोबतच सल्लागार म्हणून परशुराम मेत्री, तर सदस्य म्हणून चंद्रू मुरारी, रमेश हिरेमठ, जे. बी. मनियार, प्रमोद हळगेकर, त्रिवेणी अष्टेकर, प्रकाश पाटील आदींची सर्वानुमते निवड करण्यात आली.

Tags: