आंतरराष्ट्रीय मादक पदार्थ सेवन आणि अवैध तस्कर विरोधी दिनानिमित्त बेळगाव येथे जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.


अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासन विभाग, बेळगाव जिल्हा औषध विक्रेते संघ, केएलई संस्था आणि जितो फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या रॅलीचा प्रारंभ डीसीपी नारायण बरमणी यांनी केला.

बेळगाव शहरातील राणी चन्नम्मा चौकाजवळील कन्नड साहित्य भवनापासून या रॅलीला सुरुवात झाली. मुख्य रस्त्यांवरून मार्गक्रमण करत ही रॅली केएलई सेंटिनरी कन्व्हेंशन सेंटर येथे पोहोचली. रॅलीत सहभागी झालेल्या विभिन्न फार्मसी कॉलेजच्या शेकडो विद्यार्थ्यांनी आणि औषध विक्रेत्यांनी मादक पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत घोषणा देत जनतेमध्ये जनजागृती केली.
मादक पदार्थांमुळे केवळ व्यक्तीचे आरोग्यच बिघडत नाही, तर संपूर्ण कुटुंब, समाज आणि देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होते, अशी चिंता डीसीपी नारायण बरमणी यांनी व्यक्त केली.
तरुण पिढी व्यसनाधीनतेकडे वळू नये म्हणून औषध विक्रेत्यांनी एकत्र येऊन हा विशेष प्रयत्न केला असून, तरुणांनी अमली पदार्थांना नकार देऊन निरोगी भविष्याची निवड करावी, असे नारायण कुलकर्णी आणि संजय कुलकर्णी यांनी म्हटले.
या प्रसंगी संघटनेचे प्रमुख नारायण कुलकर्णी, संजय कुलकर्णी आणि बीडीआरपीएचे अध्यक्ष बी. बी. सदलगे उपस्थित होते.


Recent Comments