Belagavi

बेळगावचे वकील आय. एम. पाटील बार कौन्सिल निवडणुकीत विजयी

Share

कर्नाटक राज्य बार कौन्सिल निवडणुकीत बेळगाव वकील संघटनेचे प्रमुख उमेदवार आय. एम. पाटील यांनी शानदार विजय मिळवला आहे. बेंगळुरूनंतर राज्यातील दुसऱ्या सर्वात मोठ्या वकील संघटनेसाठी हा विजय अत्यंत मानाचा समजला जात आहे.

या निवडणुकीत आय. एम. पाटील यांनी १३ वे स्थान पटकावून बार कौन्सिलवर आपली जागा निश्चित केली. या यशानंतर बेळगाव बार असोसिएशनच्या वतीने त्यांचा गौरव करण्यात आला आहे.

या निकालावर आनंद व्यक्त करताना बेळगाव वकील संघटनेचे अध्यक्ष एस. एस. कीवडसन्नवर यांनी, “आय. एम. पाटील यांच्या विजयामुळे आमच्या बार असोसिएशनचा मान वाढला असून जिल्ह्यातील सर्व १४ तालुका वकील संघटनांच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो,” असे म्हटले. तसेच नवनिर्वाचित सदस्यांचे बंधू लिंगनगौडा पाटील यांनी, “थोरले बंधू ईश्वर मल्लप्पा पाटील यांनी राज्य वकील परिषदेत स्थान मिळवणे हा संपूर्ण जिल्ह्याचा गौरव आहे,” अशी प्रतिक्रिया दिली. या विजयामुळे बार कौन्सिलमध्ये बेळगावचे प्रतिनिधित्व अधिक मजबूत झाले आहे.

Tags: