Belagavi

‘ईडी’ छाप्याबाबत आधी कोणतीही कल्पना नव्हती; सतीश जारकीहोळींचे स्पष्टीकरण

Share

बेळगावचे अतिरिक्त अबकारी आयुक्त आणि आपले मेहुणे वाय. मंजुनाथ यांच्या घरावर पडलेल्या ‘ईडी’ (ED) छाप्यावर सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. या छाप्याबाबत आपल्याला आधी कोणतीही कल्पना किंवा माहिती नव्हती, असे त्यांनी स्पष्ट केले.

अधिकाऱ्यांनी हा छापा कोणत्या कारणासाठी टाकला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. या कारवाईचा पूर्ण अहवाल आल्यानंतरच आपण यावर बोलू शकु, असे सांगत जारकीहोळी यांनी तोपर्यंत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना ते म्हणाले की, जूनमध्ये विस्तार होण्याची शक्यता कमी असून तो जुलैमध्ये होऊ शकतो. अशोक पट्टण, मतीन कौजलगी आणि गणेश हुक्केरी यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते मंत्रिपदाच्या शर्यतीत आहेत. मात्र, अंतिम निर्णय हायकमांड घेईल.

जिल्ह्यातील पाणीटंचाईवर बोलताना त्यांनी सांगितले की, हिडकल जलाशयात सध्या पुरेसे पाणी आहे. त्यामुळे पुढील १५ दिवस पिण्याच्या पाण्याची कोणतीही अडचण भासणार नाही. पाऊस न पडल्यास शेतीसाठी अडचण होऊ शकते, मात्र सरकार पर्यायी व्यवस्था करेल.

Tags: