Chikkodi

सारापूर ग्रामस्थांचे अबकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन

Share

हुक्केरी तालुक्यातील सारापूर गावात नवीन दारू दुकान सुरू करण्यास स्थानिक नागरिकांनी तीव्र विरोध केला आहे. या दुकानामुळे गावाची शांतता भंग होत असल्याचा आरोप करत, ग्रामस्थांनी चिक्कोडी येथील अबकारी उपविभागीय कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

दारूच्या दुकानामुळे गावात तळीरामांचा उपद्रव वाढला असून महिला आणि विद्यार्थिनींना रस्त्यावरून चालणे कठीण झाले आहे. दररोजच्या कौटुंबिक वादांमुळे अनेक गरीब कुटुंबे उद्ध्वस्त होत असल्याचा संताप आंदोलक महिलांनी व्यक्त केला.

आंदोलकांनी चिक्कोडी अबकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. सारापूर गावात कोणत्याही परिस्थितीत दारूविक्रीला परवानगी देऊ नये आणि हे दुकान तातडीने बंद करावे, अशी मागणी त्यांनी केली.

प्रशासनाने या मागणीची दखल न घेतल्यास आगामी काळात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या आंदोलनात सारापूर गावातील प्रमुख नेते, तरुण आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

Tags: