hubali

हुबळीत वीजजोडणीच्या वादातून चहाविक्रेत्यावर हल्ला

Share

वीजजोडणी कापल्याच्या कारणावरून चहाविक्रेता आणि स्थानिक दुकानदारांमध्ये झालेल्या वादाचे पर्यवसान हाणामारीत झाले. या घटनेत चहाविक्रेत्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला असून, परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हुबळी जवळील अंचिटीगेरी येथे वीजजोडणी खंडित झाल्यावरून दोन गटांत वाद सुरू झाला. हा वाद पाहता पाहता इतका विकोपाला गेला की, समोरील व्यक्तींनी चहाविक्रेत्यासह दोघांना बेदम मारहाण केली. या हल्ल्यात एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

जखमी व्यक्तीला तातडीने हुबळी येथील किम्स (KIMS) रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर अतिदक्षता विभागात वैद्यकीय उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

या घटनेची माहिती मिळताच हुबळी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून, मारहाण करणाऱ्या संशयितांचा शोध सुरू केला आहे.

Tags: