बेळगाव येथे अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी अतिरिक्त उत्पादन शुल्क आयुक्त आणि त्यांच्या निकटवर्ती बांधकाम व्यावसायिकाच्या निवासस्थानी अचानक छापे टाकले. या कारवाईत दोन्ही ठिकाणी संशयास्पद कागदपत्रांची कसून तपासणी सुरू आहे.

अंमलबजावणी संचालनालयाच्या अधिकाऱ्यांनी आज पहाटे बेळगावमध्ये कारवाई केली. उत्पादन शुल्क विभागाचे अतिरिक्त आयुक्त वाय मंजुनाथ यांच्या निवासस्थानी अधिकाऱ्यांचे पथक दाखल झाले असून तिथे कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे.

मंजुनाथ यांचे निकटवर्तीय असलेले बेळगावमधील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक नूरानी यांच्या हनुमान नगर येथील निवासस्थानीही तपास यंत्रणेच्या पथकाने एकाच वेळी छापा टाकला. नूरानी यांच्या घरात महत्त्वाचे दस्तऐवज आणि मालमत्तेच्या तपशिलांची चौकशी सुरू असून या दुहेरी कारवाईची बेळगाव जिल्ह्यात चर्चा आहे.


Recent Comments