बेळगावातील केएलई शताब्दी संमेलन केंद्रात आजपासून तीन दिवसीय ‘दुसरे व्हिजन कर्नाटक’ भव्य वस्तूप्रदर्शन सुरू झाले आहे. विकसित भारत-२०४७ चे उद्दिष्ट ठेवून विविध सरकारी योजनांविषयी सार्वाजनिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी या महा-प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीने आणि खासदार जगदीश शेट्टर यांच्या मार्गदर्शनाने बेळगावातील नेहरू नगर येथील जीएनएमसी कॅम्पसमधील केएलई संमेलन केंद्रात या प्रदर्शनाला सुरुवात झाली. संरक्षण, विज्ञान आणि तंत्रज्ञान, आरोग्य, कृषी, रेल्वे, बँकिंग आणि शिक्षण यासह विविध प्रमुख क्षेत्रांतील सरकारी धोरणे आणि योजनांची माहिती देण्यासाठी हे प्रदर्शन २५ जूनपर्यंत सकाळी १०:०० ते संध्याकाळी ५:०० या वेळेत सर्वांसाठी खुले राहील.
भारत सरकारच्या प्रमुख विभागांची कामगिरी आणि विकासकामे समाजापर्यंत पोहोचवण्यात व्हिजन कर्नाटक प्रदर्शन यशस्वी ठरले आहे. या प्रदर्शनामुळे प्रामुख्याने विद्यार्थी आणि नागरिकांच्या ज्ञानात भर पडेल, तसेच हा उपक्रम केवळ रोजगार निर्मितीपुरता मर्यादित नसून सरकारच्या सर्वसमावेशक प्रगतीची ओळख करून देणारा आहे, असे खासदार जगदीश शेट्टर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले.


या महा-प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण म्हणजे कृषी क्षेत्रापासून माहिती तंत्रज्ञानापर्यंत विविध दालने उभारण्यात आली असून, देशातील अग्रगण्य संस्थांचे प्रतिनिधी येथे उपस्थित आहेत. यासोबतच शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी विशेष रसोत्तम स्पर्धा आयोजित केल्या असून विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जातील. इस्रो, आयसीएमआर, एलआयसी आणि नॅशनल इन्शुरन्स यांसारख्या देशातील आघाडीच्या संस्थांनी या कार्यक्रमाला प्रायोजित केले असून, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा, अशी प्रतिक्रिया आमदार अभय पाटील यांनी दिली.



Recent Comments