Belagavi

खानापूरमधील गावांच्या रस्ते विकासासाठी खास. कागेरिंना निवेदन

Share

खानापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीच्या वतीने खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

समितीने दिलेल्या निवेदनानुसार, खानापूर तालुक्यातील मोहीशेत ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या पिंपळे, मांजरेपाय, माचाळी आणि घारली या गावांमध्ये सुमारे दोन कोटी रुपये खर्च करून तातडीने रस्ते विकास कामे हाती घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

हलकर्णी ग्रामपंचायत हद्दीतील माडेवाडी आणि कुडचवाड गावांच्या एस.सी. वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी एक कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर करावा, अशी आग्रही मागणी या वेळी करण्यात आली.

या निधीतून संबंधित वस्त्यांमध्ये सिमेंट रस्ते आणि सिमेंट गटारे बांधून मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी विनंती करण्यात आली आहे. खासदार विश्वेश्वर हेगडे कागेरी यांनी या मागण्यांवर योग्य पावले उचलण्याचे आश्वासन दिले.

Tags: