होनगा येथील डॉ. रवी बी. पाटील आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय आणि संशोधन केंद्रात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


या कार्यक्रमात लोकप्रतिनिधी, डॉक्टर आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. “योग हा आरोग्य, शांती आणि समृद्ध जीवनाचा मूळ आधार आहे,” असा संदेश या प्रसंगी देण्यात आला.


या कार्यक्रमाला भाजप उत्तर मंडळाचे पदाधिकारी, नगरसेवक, ज्येष्ठ नागरिक, प्रमुख वैद्यकीय अधिकारी, प्राध्यापक, महाविद्यालयाचे कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Recent Comments